Main content

शिख दंगलीच्या कटू आठवणी!

पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीत मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळला. शिख समाज आणि त्यांची मालमत्ता यांना लक्ष्य करण्यात आलं होतं. 'ऑपरेशन ब्लू स्टार'दरम्यान शिखांच्या सुवर्णमंदिरात लष्कर शिरलं होतं. आपल्या पवित्र स्थानाचा अपमान झाल्याचा राग शिखांच्या मनात होता. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या ऑपरेशनला हिरवा कंदील दाखवल्याचा राग शिखांच्या मनात होता. त्यातूनच 31 ऑक्टोबर 1984 रोजी इंदिरा गांधी यांची हत्या करण्यात आली. ही हत्या त्यांच्या शिख अंगरक्षकांनी केल्याचा राग मनात ठेवत शिखांविरोधात हिंसाचार सुरू झाला.

Release date:

Duration:

1 minute